संपादक - आशिष बडवे

Monday, June 15, 2009

wpbf755171.png

शाहरुख आणि तीन सुंद-या  

करीना, प्रियंका आणि दीपिकाने मैत्री जपली   

सध्या बॉलीवूडमध्ये पाहुणे कलाकाराचे फॅड आहे. एखाद्या गाण्यात सर्व कलाकारांची जत्रा भरवायची आणि नाचायचे.. म्हणजे त्या चित्रपटाची क्रेझ वाढते असा अलिखित नियमच झालाय. दुस-यांच्या चित्रपटात सेलिब्रेटी म्हणून नाचणा-या शाहरुखनेही आपल्या चित्रपटासाठी ही आयडीया उचललीय.

 

'बिल्लू बार्बर' या त्याच्या आगामी चित्रपटात त्याचे आयटम सॉग आहे आणि तो करीना कपूर, प्रियंका चोप्रा, आणि दीपिका पदुकोणबरोबर थिरकतो आहे. तीन गाण्यांमध्ये या तीन सुंद-या शाहरुखबरोबर नाचणार आहेत. करीना कपूरला वाटते की, तिचे गाणे चांगले झालेय. दुसरीकडे प्रियंकाही शाहरुखची स्तुती करताना आपली पाठही थोपटून घेते आहे.

 

'मी शाहरुखची फॅन आहे आणि आमची जोडी चांगली दिसते' इतके सांगून ती थांबली नाही. 'रब ने बना दी जोडी' मध्ये संधी मिळाल्यास मी नाचली असते, असे तिने सांगून टाकले.

तिसरी आयटम क्वीन दीपिका पदुकोणला मात्र आपली पायरी माहीत आहे. त्यामुळे ती हवेत गेलेली नाही. दोन सेक्सी नायिकांबरोबर आणि शाहरुखबरोबर काम करून त्यांच्या गुडबुकमध्ये आपले नाव दाखल केल्याचा आनंद होत असल्याचे तिचे म्हणणे आहे.

wp19e5779b_0f.jpg
wp8b9e085b.jpg
wp37e96d27.jpg

काजोल कर्मविर पुरस्काराने सन्मानित होणार

बॉलिवूड अभिनेत्री काजोलला सामाजिक कार्यात योगदान

दिल्याबद्दल कर्मवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात

येणार आहे. हा पुरस्कार तिला आय-सीओएनजीओ आणि

खेमका फाउंडेशनतर्फे देण्यात येईल. शिक्षणाच्य

ा सुविधांपासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षण

देण्याच्या कामात काजोलने मदत केली आहे.

सामाजिक कार्यात व्यस्त असलेली काजोल काही

चित्रपटांच्या चित्रीकरणातही गुंतलेली आहे. सध्या

ती "माय नेम इज खान' या चित्रपटात काम करत

आहे.

रसिकांची आवडती काजोल निर्माता-दिग्दर्शकांचीही

पहिली पसंती असते; परंतु प्रत्येक दिग्दर्शक

करण जोहरप्रमाणे नशीबवान नसतो. तरुण दिग्दर्श

क करण आपल्या आवडत्या अभिनेत्रीकडे- म्हणजेच काजोलकडे कोणत्याही चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन गेला, तर काजोल त्याला नकार देणे शक्‍यच नाही; परंतु "माय नेम इज खान' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान करणने काजोलला आपल्या एका नवीन चित्रपटात काम करण्याची विनंती केली. हा चित्रपट इंग्रजीतील यशस्वी आणि बहुचर्चित "स्टेपमॉम' या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन आहे. हा प्रस्ताव ऐकल्यानंतर काजोलने क्षणभरही विचार न करता भूमिका करण्यासाठी नकार दिला. तिचा नकार ऐकून करणला प्रश्‍न पडला. काजोलने या चित्रपटात काम करण्यास नकार का दिला, हे त्याला कळत नव्हते. मात्र, त्यानंतर सांगण्यात आले, की करण येण्याआधी फॅशन डिझायनर विक्रम फडणीस "स्टेपमॉम' याच चित्रपटाच्या रीमेकचा प्रस्ताव घेऊन आले होते. काजोलला चित्रपटाची पटकथा आवडली नाही आणि तिने विक्रम फडणीस यांना नकार दिला. करण जोहरला ही गोष्ट कळल्यानंतर त्याने काजोलचे मन वळविण्याचे ठरवले. त्यानंतर "स्टेपमॉम'चा हिंदी रीमेक अतिशय चांगल्या पद्धतीने बनवला जाईल, असे करणने तिला सांगितले. शेवटी मैत्रीचा विचार करून काजोलने या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. करण जोहर सध्या या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्‍शनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात काजोलबरोबर करिना कपूरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघींचा "कभी खुशी कभी गम' नंतरचा हा पहिलाच चित्रपट आहे.

सेलेनाचा नवा बॉयफ्रेंड

 

सेलेना जेटलीची आतापर्यंत दोन-तीन प्रेम

प्रकरणं फसली. मात्र, आता तुषार कपूरच्या

रूपाने तिला नवा बॉयफ्रेंड मिळाला आहे.

एकता कपूरने बनवलेला "सी कंपनी' आणि

अलीकडच्या "गोलमाल रिटन्‌र्स' या चित्रपटा

ंत ही जोडी चमकली. त्यानंतर या दोघांचे सूर

जुळायला लागले. मात्र, या प्रकरणाचा

शेवट मागच्या प्रेम प्रकरणासारखा होऊ नये,

अशीच सेलेनाची इच्छा आहे.

जितेंद्रसारखा एकेकाळचा सुपरस्टार पिता,

एकतासारखी सिरियल क्‍वीन बहीण अशी

कौटुंबिक पार्श्‍वभूमी असूनही तुषार कपूरची डाळ बॉलिवूडमध्ये म्हणावी तशी शिजली नाही. मोठ्या पडद्यावर त्याने काय दिवे लावले ते सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र, सध्या सेलिना जेटलीबरोबरच्या प्रेमप्रकरणामुळे तो विशेष चर्चेत आहे. सेलेनाने तुषारबरोबर "सी कंपनी' नावाच्या चित्रपटात काम केले होते. एकता कपूरने बनवलेला हा चित्रपट केव्हा आला आणि केव्हा गेला, हे कळलेही नाही; पण तुषारच्या व्यक्‍तिगत आयुष्याला या चित्रपटाने वेगळे वळण दिले, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

या चित्रपटात सेलेनाची भूमिका छोटी असली तरी तिच्यावर एक गीत चित्रित करण्यात आले होते. थोड्याच दिवसांच्या या चित्रीकरणात तुषार आणि सेलेनाची चांगलीच दोस्ती जमली. त्यानंतर "गोलमाल रिटन्‌र्स'मध्ये दोघांनी एकत्र काम केले. या चित्रपटाचे चित्रीकरण बरेच दिवस चालले होते. त्याचा फायदा या दोघांना एकत्र राहण्यासाठी मिळाला. परदेशात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना दोघे बऱ्याच ठिकाणी एकत्र फिरत असत. चित्रपटाच्या चित्रीकरणानंतरही ही जोडी अनेकांना एकत्र फिरताना दिसली. त्यामुळे दोघांची ही दोस्ती प्रेमात बदलली असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे. सेलेनाच्या बाजूने विचार केला, तर प्रेमप्रकरणाच्या बाबतीत ती फारशी नशीबवान नाही, असे लक्षात येते. आतापर्यंत तिच्या आयुष्यात दोन-तीन पुरुष मित्र येऊन गेले. पण, त्यांच्याबरोबरचे संबंध नंतर तुटले. सातत्याने होणाऱ्या प्रेमभंगामुळे सेलेनाला निराशेने घेरले होते. मात्र, तिने करिअरकडे लक्ष दिले. आपल्याला समजून घेईल, अशा बॉयफ्रेंडचा शोध सुरू असल्याचे स्वत: सेलेनानेच अनेकदा सांगितले आहे. आता तुषारच्या निमित्ताने तिला असा बॉयफ्रेंड सापडला असल्याचे बोलले जात आहे. याच दरम्यान तुषारच्या आई-वडिलांनी त्याला भेट म्हणून दोन फ्लॅट घेऊन दिले आहेत. आपले स्वतंत्र घर असावे, अशी तुषारची इच्छा या निमित्ताने पूर्ण झाली.

नवीन घर घेतले म्हणजे आपण आई-वडिलांपासून वेगळे झालो, असा अर्थ काढू नये, तर मित्रांबरोबर वेळ घालवण्यासाठी आपल्याला स्वतंत्र घर हवे होते, असे तुषार सांगतो. अर्थात, या घरात वेळ घालवण्यासाठी सध्या तरी तुषारच्या दृष्टीने सेलेनाच जवळची दोस्त असणार, हे वेगळे सांगायला नको. या नवीन घरामुळे सेलिना आणि तुषारच्या रोमान्सची अधिकच चर्चा आहे. मात्र, सेलेनाने यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. "गोलमाल रिटन्‌र्स'नंतर मागणी वाढली असून, सध्या आपण करिअरवरच लक्ष केंद्रित करणार असल्याचे सेलेनाने स्पष्ट केले.

 

wpd57bb09a.jpg

तनुश्रीची गाडी रुळावर

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

वाद-विवादांमुळे तनुश्री दत्ताला मागचं वर्ष फार वाईट गेलं. या वर्षातही तिचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही; पण आता तिची गाडी रुळावर येत आहे. तिनं वादविवाद विसरून सारं लक्ष आपल्या कारकिर्दीवर केंद्रित केलंय. तिचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याने सध्या ती खूष आहे.

तनुश्रीला मागचं वर्ष फार वाईट गेलं. "हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकरवर गंभीर आरोप केल्यानं ती चर्चेत आली होती. त्यामुळे या चित्रपटातून तिला काढूनही टाकण्यात आलं होतं. त्यानंतर बऱ्याच दिवसांत तनुश्रीचं दर्शन मोठ्या पडद्यावर झालंच नाही. आता मात्र तिची गाडी पुन्हा एकदा रुळावर आली असून, मनमोहन मुंदडाच्या "द अपार्टमेंट'मध्ये ती मुख्य भूमिकेत आहे. या नव्या चित्रपटामुळे तनुश्री उत्साहित असून वादविवाद विसरून तिनं आपलं सारं लक्ष कारकिर्दीवर केंद्रित केलं आहे. "द "अपार्टमेंट'चं पहिलं शेड्यूल पूर्ण झाल्याचं तिने सांगितलं. बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा सेटवर काम करताना खूप चांगलं वाटतं, असं ती म्हणते. मागच्या वर्षी वाद-विवादांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याचा ती प्रयत्न करत आहे.

 

"हॉर्न ओके प्लीज'च्या निमित्ताने रंगलेल्या वादानंतर तनुश्रीने "रन भोला रन' हा चित्रपट स्वीकारला होता; पण सेटवर जाण्यास उशीर लागत असल्याने त्यातून ती बाहेर पडली, असं तनुश्री सांगते. ""मागच्या वर्षी आपल्याला एकूण ६० चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या. त्यापैकी तीस अतिशय वाईट होते, वीस ठीक होते आणि दहा फारच चांगले होते; पण हे चित्रपट आपण सोडले हीच मोठी चूक झाली,'' असं तनुश्री म्हणते. यापैकी काही चित्रपट हिट झाल्यावर आपल्याला चुकीचा पश्‍चात्ताप झाल्याचंही ती सांगते. बऱ्याच कालावधीनंतर तिला "द अपार्टमेंट'ची ऑफर मिळाली आणि तनुश्रीने ती तत्काळ स्वीकारली. असं असलं तरी मागच्या वर्षी निर्माण झालेल्या वादांमुळे आपलं फार मोठं नुकसान झालं, असं तनुश्रीला वाटत नाही.

 

"द अपार्टमेंट' ही दोन तरुणींची कहाणी आहे आणि त्यामध्ये नायकावर विशेष फोकस केलेला नाही. तनुश्रीबरोबर नीतू चंद्रा काम करत असून, तनुश्री एअरहोस्टेसच्या भूमिकेत आहे. या निमित्ताने तनुश्रीने आपला लुकही बराच बदलला आहे. नव्या चित्रपटात ती बारीक कापलेल्या केसांमध्ये आणि वेगळ्याच पद्धतीच्या कपड्यांमध्ये दिसणार आहे.

 

कोयना मित्रा आणि तनुश्रीमधील वादाचीही अनेकदा बरीच चर्चा झाली. याविषयी छेडलं असता ती म्हणते, "आमच्यामध्ये आता मैत्री राहिलेली नाही. बऱ्याच वर्षांत आम्ही एकमेकींशी संभाषण केलेलं नाही; पण आता याविषयी मला काही बोलायचं नाही. कारण त्यामुळे आणखी गैरसमज पसरतात.'' तनू, बाई गं, कोणाशी दोस्ती करावी अथवा तोडावी, हा तुझा व्यक्तिगत प्रश्‍न आहे. पण, आता तुझी रुळावर आलेली गाडी रुळावरच राहू दे, एवढीच इच्छा!

wp5ac041c7.jpg
wp3bb5d24e_0f.jpg
wp355d63f3_0f.jpg