पांढरकवडा तालुक्यात धान्याचा मोठ्याप्रमाणात अवैध साठा

अन्न पुरवठा विभागाचे दुर्लक्ष - कारवाईची मागणी

पांढरकवडा - पांढरकवडा तालुक्यात धान्याचा मोठ्या प्रमाणात अवैध साठा करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. साठेबाज व्यापाय्रांनी अधिक भाव मिळविण्याचे हेतुने हा साठा केला असुन संबंभीत अन्न पुरवठा विभागाने याकडे पुर्णतः डोळेझाक केल्याने शंका उपस्थित केल्या जात आहे.

 अवैध धंद्याचे माहेरघर म्हणुन प्रसिध्दीस येत असलेल्या पाटणबोरी मध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा करण्यात आला आहे. व्यापाय्रांच्या गोडावुनवर धाड टाकुन हा साठा जप्त करण्याची कारवाई संबंधीत विभागाने करणे आवश्यक असतांना हा विभाग याकडे पुर्णतः दुर्लक्ष करीत आहे. पांढरकवडा शहरातही मोठ्या प्रमाणात धान्यसाठा असल्याची विश्वसनीय माहीती हाती आली आहे मात्र कारवाई शुन्य असल्याने साठेबाजांना प्रशासनाकडुनच अभय मिळत आहे. संपुर्ण जिल्हयासह राज्यात धान्य साठा असलेल्या ठिकाणी प्रशासनाकडुन धाडसत्र राबविल्या जात आहे. परंतु पांढरकवडा तालुका या धाडसत्रापासुन दुर असल्याने साठेबाजांचे चांगलेच फावत आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापुर्वीच संबंधीत विभागाकडे अवैध साठ्याबाबत माहिती पुरवुन कारवाईची मागणी केली होती परंतु मनसेच्या या तक्रारीला प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याचे दिसुन येत आहे. पाटणबोरीसह पांढरकवडा शहरातही धान्यसाठा असलेल्या व्यापाय्रांच्या गोडावुनवर धाडसत्र राबवुन धान्यसाठा तात्काळ जप्त करावा अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष अनिरूध्द बडवे, मनसेचे तालुका अध्यक्ष संतोष गहुकार, मनसेचे जिल्हा सरचिटणीस संभा मडावी यांनी संबंधीत खात्याकडे केली आहे.

 

मनसेच्या रूग्णसेवा समिती अध्यक्षपदी राजू पुरी

पांढरकवडा - पांढरकवडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर शाखेच्या वतीने रूग्णसेवा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राजू पुरी यांची नियूक्ती करण्यात आली आहे.

 पांढरकवडा शहरात नेहमीच रूग्णांची सेवा प्रभावित होत आली आहे येथील उपजिल्हा रूग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध असतांनाही केवळ डाँक्टर नाही या कारणास्तव रूग्णांची हेळसांड होत आहे. छोट्या छोट्या कारणासाठी रूग्णांना प्रभारी वैद्यकीय अधिक्षक हे यवतमाळला रेफर करतांना दिसत आहे. त्यामुळे रूग्णांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर औषधीचा कमी साठा असल्याचे कारण दाखवुन उपजिल्हा रूग्णालयातील डाँक्टर रूग्णांना बाहेरून औषधा आणावसाय लावित आहेत त्यामुळे देखील रूग्णांवर अधिक खर्चाची पाळी येत आहे. ही हेळसांड रोखण्या करीता स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर शाखेच्या वतिने रूग्णसेवा समितीची स्थापना करण्यात आली असुन या समितीच्या अध्यक्षपदी राजु पुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे शहर अध्यक्ष अनिरूध्द बडवे यांनी जिल्हाध्यक्ष राजु उंबरकर यांच्या संमतीने ही समिती जाहीर केली आहे या समितीच्या उपाध्यक्षपदी प्रशांत नि. राबुत, सचिवपदी अशोक त्रिमनवार, सहसचिवपदी आकाष उईके, कोषाध्यक्षपदी शेख हमीद यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणुन अनिल तायडे, विजय गिरी, संतोष मंचलवार, किसन सिडाम, सुनिल चौधरी, दिपक माहुरे, अजय कुडमते, कैलास आडे, विनोद सोयाम यांची नियुक्ती केली आहे. ही समिती चोविस तास रूग्णांना सेवा पुरवुन देण्याकरीता प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन राजु पुरी यांनी आपल्या निवडीनंतर केले आहे. ते आपल्या निवडीचे श्रेय, शहर अध्यक्ष अनिरूध्द बडवे, जिल्हाध्यक्ष राजु उंबरकर यांना, तालुका अध्यक्ष संतोष गहुकार यांना देतात.

 

मोहदा येथे तान्हापोळा साजरा

पांढरकवडा - येथून २५ किमी अंतरावर असलेल्या मोहदा येथे तान्हा पोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ग्रामपंचायत व ग्रामवासीयांच्या वतीने हनुमान मंदिरासमोर तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम नंदीबैलाचे व गुढीचे पुजन उपसरपंच विजय तेलंगे यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा आठवडीबाजाराच्या मैदानावर झाला यावेळी सरपंच सौ मालाताई मेश्राम यांच्या हस्ते ६५० बालकांना स्टीलच्या ताटल्यांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव भुजाडे दिलीप राजुरकर, राजु गायकवाड, दिपक चौधरी, दिपक लोहीया, सिचन लोहीया, विजय काकडे, अनिल राऊत, सुरेश राऊत, ज्ञानेश्वर मेश्राम, ज्ञानेश्वर कोहळे वसंतराव कोहळे झिंगुजी राठोड चौधरी आदींनी पुढाकार घेतला.

 

मोहदा येथील पोळ्यात माजी मंत्री वसंत पुरकेंची उपस्थिती

पांढरकवडा - मोहदा येथील युवा नेहरू विद्यार्थी संघातर्फे नऊ वर्षांपासुन पोळा उत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदाही अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून हा सण साजरा करण्यात आला. कृषी प्रधान संस्कृतीला जोपासण्याचे कार्य म्हणुन पोळ्याचा उत्सव साजरा करण्यासाठी येथील विद्यार्थी संघाने पुढाकार दरवर्षीप्रमाणे पुढाकार घेतला दरवर्षी आयोजीत पोळ्यात अनेक मान्यवर हजेरी लावतात. यावर्षी माजी शिक्षणमंत्री आ. वसंतराव पुरके प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. त्यांनी नेहरू युवा विद्यार्थी संघाच्या उपक्रमाचा प्रशंसा केली. महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाचे सावट असतांनाही या आसमानी संकटांना न घाबरता एकजुटीने पोळा उत्सव साजरा करून शेतकय्रांचे मनोबल वाढविण्याचे कार्य यामधुन घडवुन आणले आहे. असे प्रतिपादन आ. वसंतराव पुरके यांनी केले आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश मानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लोखंडे तहसिलदार एम. सी धुर्वे पंचायत समिती सदस्य गणेश आडेमंचवार, आदींची उपस्थिती होती. पुरके यांनी यवतमाळ जिल्ह्यातील १६ ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत असे सांगुन साजशृंगार केलेल्या ५ बैलजोड्यांना प्रत्येकी एक हजार रूपये बक्षीस दिले. रमेश मानकर व सुनिल लोखंडे यांचे यावेळी भाषण झाले. बाबुजी धोपे यांनी प्रास्ताविकात सराटी येथून येण्यासाठी मोहदा येथे बायपास रस्त्याची गरज असुन सभागृहाची मागणी पुर्ण करावी मोहदा येथे नायाब तरसिलदार कार्यालय होते ते आता बंद आहे ते सूरू करून गैरसोय दुर करावी शिवाय, नविन पोलीस ठाणे सूरू करावे अशा अनेक समस्या मांडल्या कार्यक्रमासाठी शेतकरी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. पोळ्यात मद्यप्राशन केलेल्यांनी गोंधळ घातला मात्र पोलिसांच्या उपस्थितीमुळे अनुचित प्रकार न घडल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले.

 

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना  एटीकेटी लागु करणे अयोग्य - प्रा. सुभाष होटे

पांढरकवडा - दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना एटीकेटी लागु करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचे मत सेवा निवृत्त प्राध्यापक सुभाष होटे यांनी व्यक्त केले आहे.

दहावी आणि बारावीच्या परिक्षेत नापास होणाय्रा विद्यार्थ्यांना एटीकेटी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णय शैक्षणिक क्षेत्रात चांगलाच वादग्रस्त ठरत आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयातही धाव घेण्यात आली असुन उच्च न्यायालयाने एटीकेटीला स्थगीती दिल्याने एटीकेटी प्रवेश प्रक्रीया पुन्हा अडचणीत आली आहे. या संदर्भात बोलतांना प्रा. सुभाष होटे यांनी शासनाच्या निर्णयावरच ताशेरे ऒढले आहे. दहावी बारावीच्या परिक्षेत जे दोन विषयात अनुत्तीर्ण होतील त्यांचेकरीताच ही सवलत लागू आहे आणि ही एटीकेटी फक्त १ वर्षाकरीताच आहे. हा एक केवळ प्रयोग आहे यामुळे किती विद्यार्थ्यांचा फायदा आणि किती विद्यार्थ्यांचे नुकसान होईल याचे परिणाम नंतर परावयास मिळतील जो शिक्षण मंत्री होईल तो काहीतरी नवनविन धोरण राबवित असतो या आधिच्या शिक्षण मंत्र्याने शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहीजे म्हणुन शिक्षकांना जास्तीचे वर्ग घ्यावयास लावले कधि कधी स्वतः शिक्षणमंत्री वर्गात जावुन शिकवायचे शैक्षणिक स्तर उंचावण्याकरीता अनेक योजना आखल्या परंतु काही बदल झाला नाही सर्व जैसे थेच होते याकडे प्रा होटे यांनी लक्ष वेधले सध्याचे शिक्षणमंत्री दहावीची परिक्षाच बंद होणार अशीच घोषणा करून मोकळे झालेत आधिच विद्यार्थ्यी अभ्यास करीत नाहीत. शिक्षक व आई वडीलांची अशी नेहमीच ऒरड असते काही विद्यार्थी मात्र त्यास अपवाद आहेत. आणि दहावीची परिक्षाच बंद केली तर कोणताच विद्यार्थी ही परिक्षा गांभीर्याने घेणार नाही. विद्यार्थी शाळेत केवळ टाईमपास म्हणुन जातील अशी भिती होटे यांनी व्यक्त केली आहे. बारावीचे पण तेच हाल आहेत बारावीत ९५ ते ९८ टक्के गुण मिळविलेला विद्यार्थी मेडीकल किंवा इंजीनीयरींगचे क्षेत्र निवडतो तो पी एम टी, पी ई टी अशा परिक्षाही गुणवत्ता घेवुन पास होतो जर बारावीलाही एटीकेटी दिली तर या परिक्षांना देखील अर्थ उरणार नाही असेही प्रा. होटे यांनी म्हटले आहे. शासनाने एटीकेटी ची सवलत नव्याने उघडलेल्या महाविद्यालयांना विद्यार्थी मिळावेत याच हेतुने दिली असल्याचा सणसणीत आरोपही होटे यांनी केला आहे. त्यामुळे ए टी के टी पुर्णपणे अयोग्य असल्याचे प्रा. सुभाष होटे यांनी म्हटले आहे.

 

पावसाने पिके वाचली मात्र पाणी समस्या कायमच

पांढरकवडा - पोळ्यापासुन पावसाने दमदार सुरूवात केल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण दिसुन येत असले तरी ग्रामिण भागात पाणी समस्या मात्र कायमच आहे. पोळ्यापासुन मध्यम स्वरूपाचा रिप रिप पाऊस अधुन मधुन हजेरी लावीत आहे त्यामुळे पिकांची स्थिती चांगलीच सुधारली आहे. नापिकीचे संकट काहीकाळ तरी टळले असल्याने शेतकरी वर्ग आनंदात दिसत आहे. गणरायाचे स्वागत धुवाधार पावसाने केले पाऊस होवुनही पांढरकवडा शहरासह ग्रामिण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या कायमच आहे आज मितीस पिण्याचे पाणि गावकय्रांना आणि पांढरकवडा शहरवासीयांना मिळत आहे मात्र येणाय्रा दिवसात पाण्याची समस्या गंभीर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस पडला असला तरी विहीरीतील पाण्याची पातळी वाढलेली नाही तर नदीला पुरही गेला नाही त्यामुळे नदी नाल्यांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे पांढरकवडा शहरात अद्यापही एकवेळ पाणिपुरवठा केल्या जात आहे. मात्र महालक्ष्मी गणेशोत्सवाचे निमित्याने दोन वेळ पाणी सोडल्या जात आहे.  पावसाअभावी सोयाबीनचे पिक हातुन गेले आहे अळ्यांच्या आक्रमणाने सोयाबीनची पाने नाहीशी होवुन झाडे मरणासन्न अवस्थेत आहे पोळ्या पासुन कोसळलेल्या पावसाने मात्र सोयाबीनला नविन पालवी फुटत आहे. तर कापुस व तुरीचे पिक तरले आहे या पिकांची परिस्थीती उत्तम झाली आहे. तर शेतकरी पिकांना युरीया खत टाकण्याचे कामी लागला आहे परंतु खतांचा कृत्रीम तुटवडा निर्माण करून कृषी केंद्रधारक मोठ्याप्रमाणात नफा कमविण्याचे नादी लागले आहेत सोयाबीन वरील अळीने आता कापुस पिकाकडे आपला मोर्चा वळविला आहे कापसाचे झाडावर दिवसेंदिवस अळ्यांचे प्रमाण वाढत असल्याने शेतकय्रांना आता नव्याने ही चिंता सतावु लागली आहे. शासनाने शेतकय्रांना रासायनिक औषधी व खते उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी केल्या जात आहे.

 

जन्मनोंदणीकरीता वेळ

झरीजामणी - राजुर गोटा येथे कर्मचारीच उपस्थित राहत नसल्याने जन्माची नोंदणी करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागत आहे त्यामुळे या अनागोंदी कारभारा विरोधात जनसामान्यांमध्ये रोष दिसुन येत आहे. बी.डी.ऒचेही याकडे दुर्लक्ष आहे शासकीय कर्मचारी मन लावुन काम करीत नसल्यानेच ही समस्या निर्माण होत असल्याचा आरोप जनतेने केला आहे.

 

गणेशोत्सव काळात भारनियमन बंद

पांढरकवडा - गणेशोत्सवाला सुरूवात झाल्याच्या दिवसापासुन पांढरकवडा शहरातील भारनियमन पुर्णतःहा बंद करण्यात आल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. अत्यल्प पाऊस पडल्यामुळे पांढरकवडा शहरात मोठ्या प्रमाणात भारनियमन केल्या जात होते सकाळी ६ ते ९.१५ पर्यंत दररोज भारनियमन सुरू होते त्याशिवाय दिवसातुन अनेकदा विद्युत पुरवठा बंद केल्या जात होता परंतु गणेशोत्सवाला सूरूवात होताच शहरातील भारनियमन पुर्णताः बंद  असल्याने शहरवासीयांनी विशेष करून सार्वजनिक गणेश मंडळांनी विद्युत वितरण कंपनीचे आभार मानले आहे.

Friday, August 28, 2009 200Friday, August 28, 20099

Every citizen is a Reporter

VOICE OF HINDUSTAN

Indiatimes - Advertisement
wp5a7ad92e.png