दिनविशेष
१७९१ - तारा यंत्रणासाठी वापरली जाणारी सांकेतिक भाषा मास्क कोड निर्माण करणा-या सॅम्युअल
मार्सचा जन्म झाला.
१८२० - इंग्रज तत्त्वज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ अल्बर्ट स्पेन्सर यांचा जन्म.
१८२२ - अमेरिकन यादवी युद्धात उत्तरी राज्याचे सेनापती आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
बनलेल्या जनरल युलिसस एस. ग्रँट यांचा जन्म. ते १८६९ ते ७७ या काळात राष्ट्राध्यक्ष
होते.
१८७३ - इंग्रज अभिनेते विल्यम चार्ल्स यांचे निधन. शेक्सपिअरच्या नाटकांमधून त्यांनी
भूमिका केल्या.
१८८२ - अमेरिकन विचारवंत व लेखक राल्फ वॉल्जे इमार्सन निवर्तले.
१८८३ - श्रेष्ठ मराठी नाटककार, कथा, कादंबरीकार भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचा
जन्म.
१८९६ - पहिला कार्बनी रासायनिक धागा नायलॉन तयार करणाऱ्या वॅलेस करॉथर्स यांचा जन्म.
१८९८ - नामवंत भारतीय गणिती व ज्योतिषशास्त्रज्ञ शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचे निधन.
१९१९ - तबला उस्ताद नवाझ अल्लारख्खा यांचा जन्म.
१९२० - थोर गांधीवादी नेते आणि मॅगेसेसे अॅवॉर्ड विजेते डॉ. मणीभाई देसाई यांचा जन्म.
१९८० - सहकारी अग्रणी पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांचे निधन.
१९९८ - प्रख्यात ज्योतिर्विद शंकर बाळाजी दीक्षित यांचे निधन.
१९९८ - व्हिएतनामच्या आर्थिक पुनर्रचना प्रक्रियेची मुहूर्तमेढ रोवणारे ज्येष्ठ नेते
ग्युएन वान लिने यांचे निधन.
१९९९ - रुचिरा या पाककृतीच्या पुस्तकाच्या रूपाने घराघरांत पोहोचलेल्या कमलाबाई कृष्णाजी
ओगले यांचे निधन.
१९९९ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ऑस्ट्रेलियन चित्रकार ऑर्थर बॉइड यांचे मेलबोर्न येथे
निधन.