काश्‍मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत "हिज्बुल मुजाहिदीन'चे तीन दहशतवादी ठार झाले. यात एका "मोस्ट वॉंटेड' दहशतवाद्याचा समावेश असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

शोपियॉं जिल्ह्यातील शतधार-नासरपुरा भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिस आणि सुरक्षा दलाने आज पहाटे संयुक्त मोहीम हाती घेतली. दहशतवादी एका घरात लपून बसल्याचे लक्षात आल्यानंतर या संपूर्ण भागाला वेढा देण्यात आला. दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने घेरल्यामुळे त्यांनी गोळीबार करण्यास सुरवात केली. सुरक्षा दलानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. सुमारे सहा तास धुमश्‍चक्री सुरू होती. या दरम्यान "हिज्बुल मुजाहिदीन'चे तीन दहशतवादी ठार झाले, अशी माहिती शोपियॉंचे पोलिस अधीक्षक शाहीद मेहराज यांनी दिली.

चकमकीत ठार झालेला साकिब आणि त्याचा साथीदार पासवल हे दोघे गेले अनेक वर्षांपासून दहशतवादी कारवायांशी संबंधित होते. अनेक गुन्ह्यांमध्ये ते पोलिसांना हवे होते. चकमकीत ठार झालेल्या तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांना घटनास्थळी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला आहे.

पंतप्रधानांचा काश्‍मीर दौरा

अनंतनाग आणि काझीगुंद यांना जोडणाऱ्या लोहमार्गाचे काम पूर्ण झाले असून, या मार्गाचे उद्‌घाटन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान येत्या बुधवारी (ता. 28) जम्मू काश्‍मीरमध्ये येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवरच तीन दहशतवादी मारले गेल्याने कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येत आहे.

Tuesday, October 27, 2009

यवतमाळ जिल्ह्यातील पहिले मराठी न्यूज पोर्टल

Google
 
wp9f9c830b.png
wp414ed96e.png