करंजी रोड - (सुनिल वनकर) शेतकय्रांबरोबर आता रोज मजुरदारही आत्महत्येच्या वाटेवर

सुनिल वनकर

करंजी रोड - जिवनावश्यक वस्तुंच्या किंमती वाढतच असुन या वाढत्या महागाईला रोखण्यासाठी शासनदरबारी शुन्य प्रयत्न केल्या जात असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मजुरी करून पोट भरणाय्रा व दारिद्र्य रेषेखाली न येणाय्रा मजुरदार वर्गावर संकट कोसळले आहे. वाढत्या महागाईला कंटाळुन मजुरवर्ग आत्महत्येची भाषा बोलु लागला आहे. त्यामुळे त्यांना धिर देण्यासाठी सामाजिक संघटनांचा पुढाकार आता आवश्यक झाला आहे मागील काही दिवसांपासुन गहु, तांदुळ, दाळ, साखर तेल यांचे भाव चांगलेच कडाडले आहे व भाजीपाल्याच्या किंमतीही दिवसेंदिवस वाढतच आहे साखर २० रूपयांवरून ४० रूपयांवर पोहचली आहे गव्हाचे दर २० रू प्रति किलो, तेल ७० रू प्रति किलो, दाळ ९० रू प्रती किलो झाली आहे भाजीपाला तर सामान्यांना हातही लावु देत नाही कांदा ३० रू प्रति किलो, बटाटे २५ रू प्रति किलो, व ईतर भाजीपाल्याने ४० रू प्रति किलोचा दर ऒलांडला आहे त्यामुळे या मजुर वर्गाला आपले कुटुंब सांभाळतांना नाकीनव येत आहे ते कुटुंबाचे व्यवस्थापन करतांना महागाईने कमालीचे वैतागले आहेत कमी पावसा अभावी आधीच शेतात नापिकीचे संकट अशात हाताला कामही मिळेनासे झाले आहे शेतात काम नाही गावात मोलमजुरी नाही किराणा दुकानदारही आता उधार देईना व्यापारी कर्ज देईनात खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही मग जगावे तरी असे असा प्रश्न या मजुरदार वर्गासमोर उभा ठाकत आहे त्यामुळे शेतय्रांप्रमाणेच आपणही आत्महत्या करावी काय असा विचार त्यांनी बोलुन दाखविला

Monday, November 16, 2009

यवतमाळ जिल्ह्यातील पहिले मराठी न्यूज पोर्टल

Google
 
wp9f9c830b.png
wp78551c9d.png
wp51e8565a.png
wp62ecceaa.png