पांढरकवडा - जगाच्या विनाशाची घेतली शहवासीयांनी धास्ती

पांढरकवडा - सन २०१२ मध्ये जगाचा विनाश हा अटळ असल्याचे वृत्त ब्रिटीश साँप्टवेअर वेब बाँट ने प्रसिध्दी माध्यमांना दिले आहे त्यावर आधारीत एक विशेष वृत्त गेल्या अनेक महिन्यांपासुन विविध वृत्तवाहिन्यांवर दाखविल्या जात आहे. गेल्या ३ दिवसांपुर्वी आज तक या जगप्रसिध्द वृत्तवाहिनेनेही यावर एक रिपोर्ट सादर करून जगाच्या विनाशाची धास्ती जगभर पसरविली आहे. पांढरकवडा शहरवासीयांनिही याची चांगलीच धास्ती घेतली आहे.

 पृथ्वीचे वय किती या प्रश्नावर वैज्ञानिकांमध्ये नेहमीच मतभेद राहिले आहेत परंतु वर्तमान तांत्रीक युगात तंत्रज्ञानाचा असा काही विकास झाला आहे की त्या आधारे जगाच्या विनाशाचे अंदाज बांधल्या जात आहे. २०१२ मध्ये पृथ्वीची एका मोठ्या आकाराच्या उल्केशी टक्कर होवुन तयार होणाय्रा ब्लँक होलमध्ये पृथ्वी गडप होऊन नाहिशी होईल असे हे आजतक वरिल वृत्त होते तर ब्रिटीश साँफ्टवेअर वेब बाँट ने २१ डिसेंबर २०१२ हा जगाचा अंतिम दिवस असेल अशी भविष्यवाणी केली आहे या तारखेपर्यंत पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र पुर्णपणे बदललेले असेल अन यामुळेच जीवनाचे अस्तित्व धोक्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे याच साँफ्टवेअरने ९।११ चा हल्ला आणि त्सुनामिचीही भविष्यवाणी केली होती ती खरी ठरली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे तंत्रज्ञानातील विकासाने संपुर्ण जगापुढे समानांतर असे एक वेगळेच इंटरनेटचे जग निर्माण केले आहे पहिले जग या दुसय्रा जगाचे आश्रीत दिसुन येत आहे आपल्या पृथ्वीवर सध्या जे संकटाचे ढग फिरत आहे त्यांची माहिती आम्ही वेगवेगळ्या वेबपेजवर दिल्याचे जगाच्या विनाषाची भविष्यवाणी करणाय्रा वेब बाँट टेक्नाँलाँजीचे व्यवस्थापकीय संचालक जाँर्ज युरे यांचे म्हणणे आहे सध्या ज्या समस्या व संकटांचा सामना जग करीत आहे त्यांचे एकत्रीक आकलन करून आकडेवारी काढली जाते त्याचप्रमाणे वर्तमान काळातील संकट व समस्यांचा भविष्यात कसा किती विनाशकारी परिणाम होईल याचाही विस्तृत अभ्यास केला जातो असे ते म्हणाले शेअर बाजाराच्या स्थितीची भविष्यवाणी करण्यासाठी १९९० मध्ये हे साँफ्टवेअर विकसीत करण्यात आले हे सर्च इंजीन स्पायडर प्रमाणे काम करते. कोमत्याही शब्दांशी संबंधीत शोधात हे साँफ्टवेअर जगभरातील सर्व वेबपेजेसचा अगदी बारकाईने अभ्यास करीत असते. अशी माहितीही जार्ज युरे यांनी साईटवर दिली २१ डिसेंबर २०१२ रोजी जगाचा विनाश अटळ असल्याची भविष्यवाणी हे साँफ्टवेअर करीत आहे ९।११ च्या हल्ल्याची भविष्यावाणी सत्य ठरल्यामुळे आता या भविष्यवाणीची धास्ती संपुर्ण जगाने घेतली आहे पांढरकवडा शहरातही या भविष्यवाणीची दहशत दिसुन येत आहे

Monday, November 16, 2009

यवतमाळ जिल्ह्यातील पहिले मराठी न्यूज पोर्टल

Google
 
wp9f9c830b.png
wp78551c9d.png
wp1f84c535.png
wp0e917070.png