अर्ली आदिवासी सहकारी संस्थेत वित्तीय घोटाळा
अध्यक्ष सचिवांसह संचालकही संशयाचे भौवय्रात
प्रतिनिधी
16 नोव्हेंबर 2009
पांढरकवडा -
याबाबचे सविस्तर वृत्त असे की अर्ली येथे आदिवासी सहकारी संस्था अर्ली या नावाने एक संस्था कार्यरत आहे या संस्थेत अनेक सभासद आहेत सभासदांना केंद्र सरकार कृषी कर्ज योजनेतुन वाटप केलेल्या कर्जाची माफी देण्यात आली त्यात माफी मायना पत्रकाच्या पडताळणात हा घोटाळा उघडकीस आला आहे एकुण शिल्लक येणे बाकी 471317 रू दाखविण्यात आले असुन आँडीटच्या रक्कमेत मात्र 360451 रू वाटपाचाच हिशोब लागला आहे त्यामुळे जवळपास ११०८६६ रूची अफरातफर उघडकीस आली आहे हा लक्षावधीचा फरक आँडीट मध्ये दिसुन आला असुन उर्वरीत रक्कम गेली कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या फरकेच्या रक्कमेची अध्यक्ष सचिवांनी परस्पर विल्हेवाट लावल्याची शंका उपस्थित झाली असुन काही संचालकही संशयाच्या भोवय्रात आले आहेत. शेतकय्रांची यात मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणुक झाल्याची बाबही उघड होत आहे. कमी रक्कम वाटुन कर्ज मात्र ज्यादा वाटल्याचे दाखवुन शेतकय्रांच्या नावावर पैसा हडप केल्याचाच हा प्रकार असल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येत आहे म्हणजे शेतय्रांना प्रत्यक्षात दिलेल्या रक्कमेपेक्षा कर्जाची रक्कम जास्त दाखवुन हा घोटाळा करण्यात आला आहे कारण शासनाने माफ केलेल्या कर्जात कर्जाचा फुगविलेला आकडाही स्पष्टपणे दिसुन येत असुन ही रक्कम अध्यक्ष व सचिवांचे संगनमताने फस्त करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. शेतकय्रांच्या कर्जावर मौज करणाय्रा या अध्यक्ष सचिवांसह अर्ली आदिवासी सहकारी संस्थेतील दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची अपेक्षा खातेदारांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे या घोटाळ्याची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून सत्य बाहेर आणावे अशी मागणी जोर धरू लागली आहे या घोटाळ्यात सहकारी संस्थेत काम करणाय्रांनावरही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे हे प्रकरण उचलुन धरण्यात येणार असुन घोटाळ्यातील सुत्रधारांवर तुरूंगाची हवा खाण्याची वेळ येवु शकते अशी शक्यताही निर्माण झाली आहे
Monday, November 16, 2009
यवतमाळ जिल्ह्यातील पहिले मराठी न्यूज पोर्टल



