पोलीस दलामध्ये १५हजारांची भरती

मुंबई  - मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यास एक वर्ष पूर्ण होत असतानाच, राज्य पोलीस दलात १५ हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी केली. या भरतीमुळे वाढत्या नक्षलवादी कारवाया रोखणे शक्य होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

नायगाव येथे पोलिसांसाठीच्या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन आबांनी रविवारी केले. त्यावेळी ते बोलत होते. या नोकरभरतीमुळे पोलीसखात्यावर येणारा सध्याचा ताण कमी होण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पोलिसांच्या कुटुंबीयांना चांगल्या दर्जाचे जीवनमान साध्य व्हावे, यासाठी सरकार बांधील असून त्यासाठी चांगल्या योजना आखण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. पोलिसांनी स्वत:च्या फिटनेसची काळजी घ्यावी, असे सांगत, नायगावच्या धतीर्वर अधिकाधिक व्यायामशाळा मुंबईभर सुरू करण्याचा संकल्पही आर. आर. यांनी बोलून दाखवला. पोलिसांवर पडणारा अतिरिक्त ताण, कामाचे अनिश्चित वेळापत्रक, अनियमित जेवणाच्या वेळा या सगळ्यांमधून प्रकृती जपण्यासाठी अशा प्रकारच्या व्यायामशाळा पोलिसांना प्रोत्साहन देतील, असे मुंबईचे पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यावेळी म्हणाले. मुंबईतील पोलिसांच्या मुलांना नाममात्र फीमध्ये शिक्षण मिळावे, यासाठी नवीन शाळा सुरू करण्याची योजना आखण्यात आली असून त्यासाठी १८ कोटी रुपये राखून ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

फोर्स वन कार्यरत

दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस दल अधिक सक्षम बनवण्यासाठी 'एनएसजी'च्या धतीर्वर राज्यात सुरू करण्यात आलेल्या 'फोर्स वन'ची पहिली तुकडी कार्यरत झाली आहे. गेल्या वषीर्च्या हल्ल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजनांची घोषणा सरकारने केली होती. 'फोर्स वन' त्यापैकीच एक. या 'फोर्स वन'ची पहिली बॅच कार्यरत झाली असून दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण सध्या सुरू असल्याचे गृहखात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस दलातील १६०० तरुण अधिकारी स्वत:हून 'फोर्स वन' मध्ये दाखल झाले असून त्यांना इस्त्रायली आणि जर्मन अधिकाऱ्यांनी खडतर प्रशिक्षण दिले आहे.

..........

 

* करकरेंच्या जॅकेटची चौकशी

दहशतवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांचे बुलेटप्रूफ जॅकेट गहाळ झाल्याचे प्रकरण सध्या गाजते आहे. त्याची क्राइम ब्रॅचमार्फत चौकशी सुरू असल्याचे आबांनी सांगितले.

 

* ऑनड्युटी फाइव्ह स्टार जेवण

आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पंचतारांकित किचनमध्ये तयार केलेले जेवण ऑनड्युटी पोलिसांना देण्याची योजना आखण्यात आली असून येत्या दोन महिन्यांत ती लागू होऊ शकते, असे शिवानंदन यांनी नमूद केले.  

Monday, November 16, 2009

यवतमाळ जिल्ह्यातील पहिले मराठी न्यूज पोर्टल

Google
 
wp9f9c830b.png
wp78551c9d.png
wp3ad322ed_0f.jpg