पुणे - महाराष्ट्रात पावसाचा पुन्हा फेरा

पुणे - 'फियान' चक्रीवादळाचा तडाखा संपून तीन दिवसही झाले नाहीत, तोच राज्यात आज पुन्हा पावसाला सुरवात झाली. एकापाठोपाठ एक तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे हिवाळ्यातही पावसाळ्याचा अनुभव मिळत आहे. पूर्व आणि पश्‍चिम या दोन्ही दिशांकडून वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे सध्याचा पाऊस होत असून, पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. ऋतुमानातील बदलाचेच हे संकेत असल्याचे हवामानतज्ज्ञ मानीत आहेत.

पुणे, नाशिक, जळगाव, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत आज अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुण्यात रात्री साडेआठपर्यंत १०.८ मिलिमीटर, नाशिकमध्ये सायंकाळी साडेपाचपर्यंत १७ मिलिमीटर, जळगाव एक आणि साताऱ्यात दोन मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या अवेळी पावसाचा रब्बी पिकाला फायदा होणार असला, तरी फळबागांना मोठा फटका आहे. गेल्या आठवड्यातील पावसामुळे द्राक्षे, डाळींब, केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

'फियान' चक्रीवादळातून भूभागावर आलेले मोठ्या प्रमाणावरील बाष्प आणि राज्यभरात वाढलेले तापमान यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे पुणे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. कमी दाबाचे क्षेत्र हे पावसाळ्यातील सर्वदूर आणि मोठ्या पावसाचे मुख्य कारण मानले जाते. पावसाळ्यात कमी दाबाची क्षेत्रे जेवढी अधिक निर्माण होतील, तेवढा पाऊस चांगला होतो. या वर्षी मात्र, कमी दाबाच्या क्षेत्रांचे प्रमाणच कमी असल्याने देशातील बहुतांश भागाला दुष्काळाला सामोरे जावे लागले; मात्र पावसाळा संपून हिवाळा सुरू होताच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे तयार होऊ लागल्याने हिवाळ्यात पावसाला सुरवात झाली आहे.

''महाराष्ट्रापासून दक्षिण भारतात सध्या पश्‍चिमेकडून आणि पूर्वेकडून वारे वाहत असून, दोन्ही बाजूंना वातावरणाच्या खालच्या थरांत कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. या स्थितीबरोबर लक्षद्वीपजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सर्वत्र पाऊस होत आहे. पुढील तीन दिवस राज्यात दुपारनंतर सर्वत्र पावसाची शक्‍यता असून, हवामान ढगाळ राहील,'' असे पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांनी सांगितले.

Monday, November 16, 2009

यवतमाळ जिल्ह्यातील पहिले मराठी न्यूज पोर्टल

Google
 
wp9f9c830b.png
wp78551c9d.png
wpca64e321_0f.jpg